बांगलादेशात अराजकता माजली असून खुलेआम हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अत्याचाराचे क्लेशदायक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हिंदूंवर होत असणाऱ्या अत्याचारांवरून पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरिया चांगलाच संतापला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने बांगादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचारावरून चिंता व्यक्त केली आहे. त्याने सोशल मीडिया माध्यम ट्वीटरवर (X) पोस्ट करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. “हिंदूंवर होत असलेले अत्याचार बघून माझं रक्त खवळतंय आहे. संयुक्त राष्ट्र, संयुक्त राष्ट्र मानवधिकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार यांची शांताता शरमेची बाब आहे.” अशा संतप्त भावना दानिशने व्यक्त केल्या आहेत.
My blood is boiling seeing these atrocities against Hindus. Shame on the @UN @UNHumanRights and international human rights organizations for their silence. #SaveBangladeshiHindus https://t.co/v127XSUJGj
— Danish Kaneria (@DanishKaneria61) August 9, 2024