बांगलादेशने चलनातून माजी राष्ट्राध्यक्ष मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवला, नवीन नोटांवर हिंदू-बौद्ध मंदिरांचे फोटो

बांगलादेशच्या मध्यवर्ती बँकेने रविवारी नवीन डिझाइनसह नवीन चलन नोटा जारी केल्या आहेत. या नव्या नोटांमधून बांगलादेशचे संस्थापक आणि माजी राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवण्यात आला आहे. शेख मुजीबुर रहमान हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील होते, ज्यांना गेल्या वर्षी सत्तेवरून हटवण्यात आले.

या नव्या नोटांवर आता शेख मुजीबुर रहमान यांच्या फोटोऐवजी बांगलादेशमधील प्राकृतिक दृश्ये, ऐतिहासिक स्थळे, मंदिरे आणि बौद्ध प्रार्थनास्थळांचे चित्रण करण्यात आले आहे. ज्यामुळे देशाचा सांस्कृतिक वारसा दिसून येतो.

मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील कार्यवाहक सरकारने घेतलेला हा निर्णय बांगलादेशच्या इतिहासातील एक महत्त्वाचा बदल मानला जात आहे. यापूर्वी सर्व चलन नोटांवर शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो होता, जे 1971 मध्ये बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि देशाच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे नेते होते.