T20 World Cup – बांगलादेश हिंदुस्थानात होणार टी-२० विश्वचषक खेळणार नाही, स्पर्धेवर टाकला बहिष्कार

हिंदुस्थानात ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये बांगलादेश क्रिकेट संघ सहभागी होणार नाही. बांगलादेश सरकारने आगामी विश्वचषकावर बहिष्कार टाकला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) त्यांचे सामने हिंदुस्थानातून हलवू इच्छित होते. परंतु आयसीसीने आधीच स्पष्ट केले होते की, जर बांगलादेश सहभागी होऊ इच्छित असेल तर त्यांना त्यांचे सामने हिंदुस्थानात खेळावे लागतील. त्यामुळे बीसीबीने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, बांगलादेशने हिंदुस्थानात येण्यास नकार दिल्याने स्कॉटलंड संघाला रँकिंगच्या आधारे थेट स्पर्धेत सामील करण्यात आले आहे. स्कॉटलंडचा संघ आजवर सहा टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे. तो गेल्या चारही स्पर्धांत खेळला होता, मात्र यावेळी त्यांचा संघ पात्र ठरू शकला नव्हता. मात्र बांगलादेशमुळे त्यांना लॉटरी लागली आहे.