
बांगलादेशच्या हंगामी सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सोपविण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे. त्यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवून हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्यात आली आहे. मानवतेविरोधात हिसाचाराप्रकरणी शेख हसीना यांना बांगलादेशच्या न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा ठोठाविली होती. गेल्यावर्षीच्या उठावानंतर हसीना या हिंदुस्थानात आश्रयाला आहेत. त्यांना सोपविण्यासाठी हिंदुस्थानकडे बांगलादेशने तिसऱ्यांदा मागणी केली आहे. यावेळी बांगलादेशच्या उच्चायुक्तालयामार्फत प्रत्यार्पणाची मागणी करणारे अधिकृत पत्र देण्यात आले आहे.


























































