नाशिकमध्ये जय शहा यांच्या प्रतिमेला घातला बांगड्यांचा हार

नाशिकमध्ये हिंदुस्थानच्या क्रिकेट बोर्डाचे जय शहा यांच्या प्रतिमेला बांगडय़ांचा हार घालून संताप व्यक्त केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सौभाग्य गमावलेल्या माता, भगिनींचे अश्रू सुकलेले नसताना मोदी सरकारने पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याला परवानगी दिली. त्यामुळे देशभरात मोठय़ा प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.

मोदी सरकारच्या या निर्णयाविरोधात रविवारी महिला आघाडीच्या रणरागिणी रस्त्यावर उतरल्या. शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर त्यांनी माझं कुंकू, माझा देशआंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला घराघरांतून कुंकू पाठविण्यात आले. महिला आघाडीच्या जिल्हा संघटक स्वाती पाटील, योगिता गायकवाड, भारती ताजनपुरे आदी पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला.