फोनवरून मोनिकाने सांगितलं की बाथरुममध्ये जा आणि कपडे काढ! तरुणाची हादरवून टाकणारी कहाणी

11776

चांगली नोकरी असणाऱ्या एका तरुणाचा प्रेमभंग झाल्यानंतर त्याने दुसरं प्रेम शोधायला सुरुवात केली होती. दुसऱ्या प्रेमाच्या शोधात त्याला असा भयंकर अनुभव मिळाला आहे की पुन्हा या वाटेने जाताना तो हजारवेळा नाही तर लाख वेळा विचार करेल. डेटींग साईटच्या आधारे त्याने आपल्यासाठी प्रेयसी शोधायला सुरुवात केली होती. हे करणं त्याला फार महागात पडलं आहे.

बंगळुरू शहरातील सुदागुंटे पाल्या भागामध्ये राहणाऱ्या सुकुमार (नाव बदललेले)चं पहिल्या प्रेयसीशी ब्रेकअप झालं होतं. दुसऱ्या प्रेयसीच्या शोधात असलेल्या सुकुमारने डेटींग अॅपची मदत घ्यायला सुरुवात केली होती. या अॅपवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला मोनिका नावाच्या महिलेशी संपर्क झाला. मोनिकानेच त्याच्याशी संपर्क साधला होता असं त्याने सांगितलं आहे. मोनिकाने त्याला तिचा फोन नंबर दिला होता आणि संपर्कात राहा असं सांगितलं होतं. यानंतर तिने त्याला सतत मेसेज करायला आणि फोन करायला सुरुवात केली. सुकुमारने तिला ओळख वाढणं गरजेचं असून त्यासाठी वेळ द्यावा लागेल असं सांगितलं.

एकदा मोनिकाने सुकुमारला व्हिडीओ कॉल केला. तो त्याने उचलल्यानंतर मोनिकाने त्याच्याशी लाडीकपणे बोलायला सुरुवात केली. थोड्यावेळाने तिने सुकुमारला बाथरुममध्ये जाऊन सगळे कपडे काढ असं सांगितलं. सुकुमारने तसं केलं देखील आणि इथेच तो फसला. त्याला कल्पना नव्हती की हा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला जात होता आणि तो नग्न असतानाचं त्याचं चित्रीकरणही केलं जात होतं. मोनिकाने त्याला हा व्हिडीओ बोलणं सुरू असतानाच दाखवला होता. यामुळे मी भयंकर गडबडलो होतो असं सुकुमारने एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

हा प्रकार झाल्यानंतर मी घाबरलो होतो मात्र मोनिकाने मला प्रेमात या गोष्टी नॉर्मल असतात असं सांगत शांत करण्याचा प्रयत्न केल्याचं सुकुमारने म्हटलं आहे. यानंतर अचानक मोनिकाने आमच्यातील संभाषणाचा स्क्रीनशॉट मला पाठवला आणि 5100 रुपयांची खंडणी मागितली असं सुकुमारने सांगितलं. यामुळे हादरलेल्या सुकुमारने मोनिकाला तू खरं कोण आहेस हे खोदून खोदून विचारायला सुरुवात केली. यावर समोरच्या व्यक्तीने आपले नाव मोनिका नसून राकेश असल्याचे सांगितले. यानंतर त्याने आपल्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली असं सुकुमारने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

राकेशने सुकुमारला धमकी दिली होती की जर त्याने पैसे दिले नाही तर तो हे फोटो त्याच्या सगळ्या मित्रांच्या फेसबुक वॉलवर शेअर करेल आणि इतर सोशल मीडियावरही व्हायरल करेल. यावर सुकुमारने धीर एकवटून त्याची तक्रार सायबर क्राईमकडे करण्याचा इशारा दिला. यावर थोडं घाबरलेल्या राकेशने किमान 4 हजार रुपये तरी दे अशी मागणी केली. हे पैसे मिळाल्यावर सगळे व्हिडीओ आणि चॅट डिलीट करेन असं राकेशने सुकुमारला सांगितलं. यामुळे वैतागलेल्या सुकुमारने पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवल्यानंतरही सुकुमारला भीती वाटते आहे की राकेश त्याचे फोटो हे व्हायरल करेल.

आपली प्रतिक्रिया द्या