
देशभरातील बँकांना ऑगस्ट महिन्यात तब्बल 16 दिवस सुट्ट्या आहेत. ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थीसह दुसरा आणि चौथ्या शनिवारसह रविवारची सुट्टी असल्याने बँका बंद राहणार आहेत. 3 ऑगस्टला त्रिपुरात केर पूजानिमित्त बँकांना सुट्टी, 8 ऑगस्टला सिक्किम आणि ओडिशात तेंडोंग लो रूम फात, 9 ऑगस्टला रक्षाबंधननिमित्त उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानात सुट्टी, 10 ऑगस्टला दुसरा शनिवारनिमित्त देशभर बँका बंद, 13 ऑगस्टला मणिपुरात देशभक्त दिवस, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन, 16 ऑगस्टला जन्माष्टमी व पारसी नववर्षनिमित्त गुजरात आणि महाराष्ट्रात सुट्टी, 23 ऑगस्टला चौथा शनिवार, 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीनिमित्त बँका बंद असणार आहेत.