
उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नात वहिनीचा अडथळा नको म्हणून दिराने तिला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्याने स्वत:वर पेट्रोल ओतून आग लावली यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.
रसूलकर गावातील नरेद्र, प्रवीण सहीत तीन भावंडे आहेत. तीघांची वेगवेगळी घरे आहेत.नरेंद्र याचे लग्न 10 वर्षांपूर्वी झाले होते. मात्र त्याच्या दोन्ही भावांचे लग्न झाले नव्हते. प्रवीण आणि त्याच्या भावाल वाटायचे की वहिनी त्यांच्या लग्नात खो घालते. त्यामुळे त्यांच्या मनात वहिनीविषयी राग होता. शनिवारी संध्याकाळी वहिनी सुनीता कचरा टाकण्यासाठीघरातून निघाली होती. कचरा टाकून आल्यानंतर ती प्रविणच्या घरासमोर असलेल्या नळावर हात धुवू लागली. त्याचवेळी प्रविण तिथे आला आणि तिला खेचून घरात घेऊन गेला. त्यानंतर घराची आतून कडी लावली आणि वहिनीच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. त्यानंतर स्वत:वर पेट्रोल टाकून आग लावली. त्यानंतर कोणी त्यांना वाचवायला जाईपर्यंत दोघंही होरपळले. दोघांना उपचारासाठी शहराच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे रविवारी दोघांचा मृत्यू झाला. आता पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.