बार्टीचे संशोधक दीड वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यामार्फत 2013 पासून पीएच.डी. संशोधकांना अधिछात्रवृत्ती देण्यास सुरुवात झाली; परंतु UGC चा नियम डावलून 2013 ते 2018 पर्यंतच्या Ph.D संशोधकांना बार्टी प्रशासनाने फक्त 3 वर्षेच अधिछात्रवृत्ती दिली. BANRF- 2018 चे संशोधक विद्यार्थी गेल्या दीड वर्षापासून आपल्या न्याय्य हक्कांसाठी झगडत आहेत. गेली 35 दिवस झाले, BANRF-2018 चे संशोधक विद्यार्थी बार्टी कार्यालय येथे सातत्याने उपोषण व आंदोलने करत आहेत. दोन वर्षांत 6 वेळा त्यांनी उपोषण केले. मात्र, अद्यापि न्याय मिळालेला नाही. त्यामुळे याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी संशोधक कृती समितीने केली आहे.