खठ्ठा-मीठा, छोटी सी बातचे दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन

972

प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन झाले आहे. निधनासमयी त्यांचे वय 90 वर्षे होते. मुंबईतील सांताक्रूझ इथल्या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. मध्यमवर्गीय कुटुंबांचे विषय हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडणारे दिग्दर्शक म्हणून ते प्रसिद्ध होते. चित्तचोर, रजनी, बातों बातों में, उस पार, छोटी सी बात, खट्टा-मीठा, पिया का घर, चक्रव्यूह, शौकीन, रुका हुआ फैसला, जीना यहां, प्रियतमा, स्वामी, अपने पराये, एक रुका हुआ फैसला या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. गुरुवारी म्हणजेच 4 जून रोजी दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

बासू चॅटर्जी यांनी 1969 मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये पाय ठेवला. 1966 साली बासू भट्टाचार्य दिग्दर्शित तिसरी कसम या चित्रपटासाठी त्यांनी सहाय्यकाची भूमिका बजावली होती. खरं पाहाता बासू चॅटर्जी हे चांगले व्यंगचित्रकार होते आणि ब्लिटझ मासिकामध्ये 18 वर्ष कामाला होते. मात्र इथली नोकरी सोडून त्यांनी चित्रपट दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला होता. मध्यमवर्ग हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता आणि त्यांची तो त्यांच्या चित्रपटातून उत्तम पद्धतीने मांडला. मध्यमवर्गाच्या समस्या ते अनेकदा हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत असत

आपली प्रतिक्रिया द्या