
क्लासेसच्या नावाखाली बाजार मांडणार्या उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये इयत्ता अकरावीमध्ये शिकणार्या सतरा वर्षीय मुलीने नराधम शिक्षकांचा भंडाफोड केला आहे. वर्षभरापासून कॅबिनमध्ये बोलावून छेडछाड करत असल्याची तक्रार तिने दाखल केली. यानंतर मुलीवर अत्याचार करणारे दोन्ही शिक्षक फरार झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. या प्रकारामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. उमाकिरण शैक्षणिक संकुलाला टाळे ठोकण्यात आले आहे. क्लासेस काही काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकीकडे लाखो रुपये कमवणारे क्लासेसवाले शिक्षक कसे अनैतिक वागत आहेत याचा प्रत्यय बीडमध्ये आला आहे.
ही घटना 30 जुलै 2024 ते 25 मे 2025 या कालावधीत घडली. प्रशांत खटावकर आणि विजय पवार हे दोघेही पीडितेला वारंवार क्लास संपल्यानंतर केबिनमध्ये बोलवत असत. यावेळी पीडितेशी जबरदस्तीने अश्लील वर्तन करायचे. या प्रकारामुळे पीडिता मानसिक तणावाखाली गेली. पालकांनी विचारल्यावर तिने आपबिती सांगितली. पालकांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यानुसार गुरुवारी रात्री दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयांची तीन एकर जमीन भेट! आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
मोबाईलमध्ये काढले नग्न फोटो
पीडिता मुलगी केबिनमध्ये आल्यावर तिच्या अंगाशी लगट केली. तिला अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. त्यानंतर तिचे नग्न फोटो मोबाईलमध्ये क्लिक केले. हे सर्व पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.
उमाकिरण शैक्षणिक संकुल सील!
बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात खासगी कोचिंग क्लास घेणार्या विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोन शिक्षकांनी केलेल्या गैरकृत्यानंतर पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस प्रशासनाने उमाकिरण संकुलाला कुलूप ठोकले असून सर्व क्लासेसला सुट्टी देण्यात आली आहे. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत! भाजपचे लोणीकर म्हणतात, ही तर आमची बोलीभाषा
उमाकिरण शैक्षणिक संकुलात बीड जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी क्लाससाठी येतात. याच ठिकाणी असे घृणास्पद कृत्य उघडकीस आल्यामुळे पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना उघड झाल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी देखील याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी पोलिसांनी ठाण्यात बोलावून घेतले आहे. दुसरीकडे उमाकिरण शैक्षणिक संकुल सील करण्यात आले आहे. सर्व क्लासेसला सुट्टी देण्यात आली आहे. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.