गोदावरीच्या मध्यभागी भक्तीचा सागर, आत्मतीर्थमध्ये दत्त अवतार दिन साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेवराई तालुक्यातील पवित्र श्री क्षेत्र पांचाळेश्वर आत्मतिर्थ येथे श्री दत्त अवतार दिन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा झाला. महानुभव पंथाचे उपकाशी म्हणून ओळख असलेल्या या तीर्थक्षेत्री हजारो भाविकांनी श्री दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

पहाटे मंगलस्नान, दत्त कवच पारायण, महाआरती आणि रात्री भव्य छबिना मिरवणुकीने संपूर्ण परिसर “श्री दत्त जय जय दत्त” च्या जयघोषाने दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीने भाविकांना भक्तीरसात रंगवले.

यात्रेनिमित्त रहाटपाळणे, खेळणी, खाऊ, थंडपेय व विविध दुकानांनी परिसर गजबजून गेला. गोदावरीच्या मध्यभागी भरलेला हा सोहळा श्रद्धा, भक्ती आणि धार्मिक ऐक्याचा अविस्मरणीय उत्सव ठरला.