
>> उदय जोशी, बीड
बीड जिल्हातील बऱ्याच भागात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील 16 मध्यम तर 126 लघु प्रकल्प खचाखच भरले. तर सहा गावातील 44 लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आष्टी तालुक्यामधील कडा गावामध्ये 11 लोक, सोभा निमगाव मध्ये 14 लोक, घाटा पिंपरी 07 लोक, पिंपरखेड 06 लोक, धानोरा मध्ये 03 आणि डोंगरगण मध्ये 03 असे एकूण 06 गावात 44 लोकं अडकलेली आहेत.
जिल्हाधिकारी, बीड यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार, नगर जिल्ह्यातून लष्कराची तुकडी मदत कार्यासाठी मागविण्यात आली आहे. तसेच अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट करण्यासाठी नाशिक वरून हॅलिकॉप्टर मागविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे पुणे येथून एनडीआरएफ ची टीम बीड येथे पाठविण्यात येत आहे.