निधी मिळूनही कामे केली नाही, माजलगाव नगर परिषदेचा १५ कोटीचा निधी शासनखाती जमा होणार

574

माजलगाव येथील नगर परिषदेस शासनाने तीन वर्षापूर्वी शहर विकासासाठी दिलेले तब्बल 15 कोटी रुपये पालिकेने खर्चच केले नाहीत अशी आमदार प्रकाश सोळंके यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र या निधीचा मुदतीत खर्च न केल्याने हा निधी व्याजासह शासनाच्या खाती जमा करण्यात येणार असल्याची नवी बाब समोर आली आहे.

शासनाने या पालिकेला तीन वर्षात जवळपास 60 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता; परंतु तो केवळ कागदावरच राहिला असा आरोप केला जात आहे. शासानाचा सदर निधी 31 मार्च 2019 अखेर खर्च करण्याची मुदत होती; परंतु पालिकेने तो खर्चच न केल्याने शासन निर्णय क्रमाक 2097/प्रक्र 123 (143)/नवी-16 दिनांक 27 मार्च 2018 नुसार वैशिष्टयपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून दिलेल्या निधीच्या पत्रात हा निधी 31 मार्च 2019 पर्यंत मुदतीत न खर्च केल्यास व्याजासह शासनाच्या खात्यात जमा करण्याचे स्पष्ट निर्देश या पत्रात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले होते. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेने दिलेल्या या वर्क ऑर्डर रद्द करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे पालिकेला मिळालेला 15 कोटीचा निधी पदाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा परत जाणार असल्याने नागरीकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या