Health Tips – ड्रायफ्रुटस् भिजवुन खाण्याचे आहेत अगणित फायदे, वाचून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल

ड्रायफ्रुटस् हे आपल्या शरीरासाठी फार गरजेचे मानले जातात. ड्रायफ्रुटमधून आपल्या शरीराला पोषक द्रव्ये मिळतात. त्यामुळेच ड्रायफ्रुट खाणे हे आपल्या शरीरासाठी उत्तम मानले जाते. आपल्या शरीरासाठी ड्रायफ्रूट्स खूप फायदेशीर असतात हे सर्वांनाच माहीत आहे. ड्रायफ्रूटस् मध्ये असलेले पोषक तत्वं आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवतात. अशा परिस्थितीत कोणते ड्रायफ्रुट्स भिजवून खावेत आणि कोणते खाऊ नयेत हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. भिजवलेले बदाम आणि मनुके खाल्ल्याने अनेक फायदे होतात हे तुम्ही ऐकले असेल.

Health Tips – साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वाचा

ड्रायफ्रुटस् भिजवुन खाण्याचे अगणित फायदे

ड्रायफ्रुटस् भिजवल्याने त्यातील पोषक द्रव्ये अधिक सहजतेने आपल्या शरीरात पोहोचतात. त्यामुळे ड्रायफ्रुटस् खाण्याचा शरीराला खूप फायदाही मिळतो.

भिजवल्यामुळे ड्रायफ्रुटस् मधील फायटिक अॅसिड कमी होते. यामुळे आपले पचन सुधारण्यास मदत होते. तसेच त्यामुळे आपल्या शरीराला अधिक पोषण मिळते.

दिवसभर उर्जावान राहण्यासाठी, भिजवलेले ड्रायफ्रुटस् खाणे हे  खूप  गरजेचे आहे.

काहींना ड्रायफ्रुट कच्चे खाल्ले तर अॅलर्जी होण्याची भीती असते. भिजवल्यामुळे ड्रायफ्रुट बाधण्याची शक्यता फार कमी असते.

काही ठराविक ड्रायफ्रुट म्हणजेच बदाम, मनुका भिजवुन खाल्ल्याने हार्ट अॅटकचा धोका कमी होतो.

भिजवलेल्या ड्रायफ्रुटमध्ये फायबरचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेवर मात करण्यासाठी हा पर्याय सर्वात उत्तम मानला जातो.


चला तर मग जाणून घेऊया कोणते ड्रायफ्रूट भिजवून खावे 

सर्व ड्राय फ्रूट्स भिजवून खाणे फायदेशीर नाही. कारण सर्व ड्रायफ्रूट्स भिजवून तुम्हाला फायदा मिळेलच असे नाही. बदाम, बेदाणे आणि ड्राय प्लम्स यासारखे भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाणे अधिक फायदेशीर मानले जाते.


जाणून घ्या कोणते ड्राय फ्रूट्स भिजवून खाऊ नयेत

काजू, अक्रोड, शेंगदाणे, पिस्ता, खजूर न भिजवता खाऊ शकता. काही सुका मेवा आणि काजू, विशेषत: अक्रोडमध्ये आवश्यक फॅटी ऍसिड असतात, जे रात्रभर भिजवल्यानंतर कमी होऊ शकतात. त्यामुळे ते भिजवून खाणे टाळा. खजूर किंवा मनुका दोन्ही प्रकारे तुम्ही खाऊ शकता, तरीही तुम्ही ते भिजवून खाऊ शकता आणि वाळलेल्या स्वरूपातही खाऊ शकता.