बंगाल वॉरियर्सचा विजय

दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत वैभव गरजेच्या अप्रतिम बचावाच्या जोरावर बंगाल वॉरियर्स संघाने तेलुगू टायटन्स संघाचा 46-26 असा पराभव करताना आपली चार पराभवांची मालिका संपुष्टात आणली. वैभवने 9 पकडी करताना विजायात एकहाती मोलाचा वाटा उचलला. टायटन्सचा कर्णधार पवन सेहरावतने सुपर 10 गुणांची नोंद करूनही त्याला पराभव टाळता आला नाही. एनएससीआय स्टेडियमवर झालेल्या या लढतीत खरे तर बंगाल वॉरियर्स संघ कर्णधार व अक्वल आक्रमक मनिंदरशिवाय मैदानात उतरला. मात्र त्याच्या जागी खेळणाऱया नितीन कुमारने वेगवान चढायानी टायटन्सला झुंजवले. आजचा कर्णधार शुभम आणि वैभव यांच्या कामगिरी मुळे सात मिनिटात टायटन्सवर पहिला लोन चढवून वॉरियर्स संघाने 10-4 अशी आघाडी घेतली. वैभवने टायटन्सचा कर्णधार पवनला पेचात पकडून आपला सहावा पकडीचा गुण मिळवला. त्यामूळे मध्यंतरास टायटन्स वर दुसरा लोन चढवून वॉरियर्स संघाने 27-10अशी आघाडी घेतली.