फ्रेंच फाईज खाऊ न देणाऱ्या नवऱ्याला कोर्टात खेचलं; पोलिसांनीही जारी केली लूक आउट नोटीस

karnataka-high-court

कर्नाटक उच्च न्यायालयातील एक प्रकरण लक्षवेधी ठरलं आहे. नवऱ्याने बायकोला फ्रेंच फ्राईज खाण्यापासून रोखलं. हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं असून पोलिसांनी थेट लूक आऊट नोटीस जारी केली आहे. दरम्यान न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी त्या व्यक्तिवरील सर्व आरोप हे क्षुल्लक असल्याचं म्हंटलं आहे. अशा क्षुल्लक प्रकरणाचा तपास करणं म्हंणजे कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग करण्यासारखे आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिनेने आपल्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली, तो अमेरिकेत नोकरी करतो. त्याने आपल्या मुलाच्या जन्मानंतर बायकोला फ्रेंच फाईज खाण्यास नकार दिला होता. त्यामुळे महिलेले न्यायालयात याबाबत दाद मागितली. मात्र महिलेच्या तक्रारीनंतर कर्नाटक पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली.

कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी त्या व्यक्तीवरील आरोप अत्यंत क्षुल्लक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे तपासाला स्थगिती दिली. या प्रकरणाचा तपास सुरू ठेवणं म्हणजे न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यासारखं आहे. त्यामुळे न्यायालयाच्या कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग होईल.

दरम्यान, प्रकरणावरील सुनावणीवेळी नवऱ्याच्या वकिलाने याचिकेला स्थगिती देण्याची विनंती केली होती. नवऱ्याच्या वतीने युक्तीवाद करणाऱ्या वकिलाने न्यायालयात अनेक मुद्दे मांडले. महिलेच्या तक्रारीनंतर पतीविरोधात एक लुक आऊट नोटीस (LOC) जारी करण्यात आले. ज्यामुळे त्याला यूएसला कामावर जाण्यापासून रोखलं जात आहे. त्यामुळे न्यायालयानं याचा गांभीर्यानं विचार करावा अशी विनंती वकिलानं न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयानं त्याच्याविरोधातील लूक आऊट नोटीसला देखील स्थगिती दिली असून त्याला अमेरिकेला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.