बंगळुरूमधील तीन कॉलेजला बॉम्बने उडवून देण्याची धमकी शुक्रवारी मिळाली. धमकीचा मेल मिळताच पोलिसांचे पथक आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी पोहोचले. धमकी मिळालेल्या तीन कॉलेजमध्ये बीएमएस कॉलेज, एमएस रामैया कॉलेज आणि बीआयटी कॉलेजचा समावेश आहे. कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचे धमकीच्या ईमेलमध्ये म्हटले आहे.