
विक्रोळीच्या कन्नमवार नगर नंबर 2 येथे बेस्ट बसचा आज विचित्र अपघात झाला. एअर भरण्यासाठी बराच वेळ लागतो म्हणून चालक बस चालू ठेवून लघुशंकेला गेला. नेमकी बस उतारामुळे जवळपास 40 मीटरपर्यंत जाऊन तेथील एका चहाच्या टपरीवर धडकली. यामध्ये एक रोजंदारी कामगार जखमी झाला.
सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास चालक संतोष देऊळकर (55) यांनी कन्नमवार नगर नंबर 2 येथील जनता मार्केट येथील बस स्टॉपच्या बाजूला विक्रोळी ते अंधेरी या मार्गावर धावणारी 185 क्रमांकाची बस न्युट्रल करून उभी केली. बसची एअर भरण्यासाठी वेळ लागतो म्हणून बस चालू करून ते लघुशंकेसाठी गेले. अचानक बस ही उतारामुळे जवळपास 40 मीटरपर्यंत गेली आणि तेथील द टी बार या जनरल स्टोअरला धडकली.