विक्रोळी आणि घाटकोपर येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटी व स्वामी शामानंद एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थांनी यंदाही बारावी, दहावी परीक्षेत उत्तम कामगिरी केली आहे. संस्थांच्या विद्या विकास माध्यमिक शाळा वांगणी, स्वामी शामानंद नाईट हायस्कूल घाटकोपर आणि विद्या विकास नाईट हायस्कूल, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर व मातोश्री पार्वती राऊत विद्यालय, रेडी गाव, तालुका वेंगुर्ला या शाळांचा दहावी बोर्डाचा निकाल 100 टक्के लागला आहे. विकास हायस्कूलचा निकाल 97.46 टक्के व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा निकाल 98.55 टक्के इतका लागला आहे. स्वामी शामानंद हायस्कूल घाटकोपरचा 97.05 टक्के व विकास रात्रशाळेचा निकाल 88.23 टक्के इतका आहे.
बारावीचा वांगणी येथील शाळेचा निकाल 100 टक्के असून विकास हायस्कूल जुनियर कॉलेजच्या आर्टस्, कॉमर्स व सायन्स विभागांचा सरासरी निकाल 88.88 टक्के, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, जुनियर कॉलेजचा निकाल 72.5 टक्के, स्वामी शामानंद जुनियर कॉलेजचा निकाल 78.4 टक्के एवढा लागला आहे. विकास रात्रशाळा जुनियर कॉलेजचा बारावीचा निकाल 71.4 टक्के इतका लागला असून विद्या विकास रात्रशाळा व जुनियर कॉलेज घाटकोपर यांचा बारावीचा निकाल 60 टक्के लागला आहे. संस्थेचे अध्यक्ष प. म. राऊत व चिटणीस, डॉ. विनय राऊत यांनी विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांचे यशस्वी विद्यार्थ्यांसोबत अभिनंदन केले आहे.