Video गणपती बाप्पाच्या सेवेसाठी खासदार झाले भजनीबुवा

5418

सर्वसामान्यांचा आवाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत बुलंद करणाऱ्या खासदारांच्या गळ्यातून निघणारे सुरेल सूर ऐकून अनेक जण थक्क झाले. कोकणामध्ये भगवान गणेशाच्या सेवेत सगळेजण रमलेले आहेत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील निवासस्थानी देखील गणपती बाप्पाचे आगमन झाले आहेत. त्याच्या सेवेसाठी विनायक राऊत यांनी आपली सगळी बिरूदावली काही काळ बाजूला सारत भजनीबुवा होत सूर धरला. पेटीवर सफाईदारपणे फिरणारी त्यांची बोटे पाहून आणि खड्या सुरामध्ये त्यांनी भजन म्हणायला सुरुवात केली तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. भजनाला जेव्हा टाळ मृदंगाची साथ लाभली तेव्हा सगळे जण तल्लीन होऊन भजनात सहभागी झाले.

आपली प्रतिक्रिया द्या