भंडारदरा धरण ९० टक्के भरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

अहमदनगर जिल्ह्याला वरदान असलेले भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरण ९० टक्के भरले आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून ३८७१ क्यूसेक वेगाने नदीत विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे प्रशासनाने नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरवर्षी साधारणत १५ ऑगस्टच्या दरम्यान भरणारे भंडारदरा धरण, यंदा एक महिना पुर्वीच भरण्याच्या मार्गावर आहे. भंडारदरा धरणाची क्षमता अकरा टिएमसी असुन, सध्या धरणात साडेनऊ टिएमसी पाणी साठा झाला आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने परिसरातील धबधबेही ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे निसर्ग सौंदर्य आणखीनच खुलले आहे.