खासदार अरविंद सावंत आणि कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या सहकार्याने चर्नी रोड येथे रॉक्सी थिएटरमध्ये भारतीय कामगार सेनेचे युनिट सुरू

शिवसेना नेते, भारतीय कामगार सेना अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत आणि कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या सहकार्याने  चर्नी रोड येथे रॉक्सी थिएटरमध्ये भारतीय कामगार सेनेचे युनिट सुरू करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर भारतीय कामगार सेनेच्या बोर्डाचे उद्घाटन थिएटरमध्ये करण्यात आले. यावेळी सहचिटणीस शरद आजगावकर, कार्यकारिणी सदस्य राम साळवी, मुक्ता ए-2 मॅनेजमेंटचे एचआर अनिल मिश्रा, दामोदर भोईर तसेच रॉक्सी थिएटरचे युनिट अध्यक्ष अरविंद चौहान, सरचिटणीस मोहम्मद शमशाद, खजिनदार विनोद वैती आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते