शिक्षिकेच्या कारने वृद्धेला चिरडले

भाईंदर येथील उत्तन परिसरात असलेल्या गोशाळेत आलेल्या एका वृद्धेला कारने चिरडले. यामध्ये कृष्णा शर्मा (८५) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जलपा ओझा (४२) या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली. या अपघातात कृष्णा शर्मा यांची मुलगी भावना गंभीर जखमी असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बोरिवली येथे राहणाऱ्या कृष्णा शर्मा या पती दयानंद आणि मुलगी भावना यांच्यासह गोशाळेत आल्या होत्या. गोशाळेच्या प्रांगणात त्या मुलीसोबत उभ्या असताना जलपा ओझा यांच्या कारने त्यांना धडक दिली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ दोघींना मीरा रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी कृष्णा शर्मा यांना मृत घोषित केले.