महानिर्मितीची ‘पॉवर’ वाढणार, भुसावळचा 660 मेगावॅटचा औष्णिक वीज संच कार्यान्वित होणार

राज्याला पुरेशी वीज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेल्या महानिर्मितीची लवकरच ‘पॉवर’ वाढणार आहे. महानिर्मितीच्या भुसावळ औष्णिक वीज पेंद्रात भेलच्या माध्यमातून तब्बल 660 मेगावॅट क्षमतेचा वीज संच उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यामधून ऑक्टोबरपर्यंत वीज निर्मिती सुरू होणार आहे. त्यामुळे महानिर्मितीची एकूण वीज निर्मिती क्षमता तब्बल 13 हजार 812 मेगावॅट होणार असल्याने राज्याला मुबलक वीज उपलब्ध होणार आहे.

सध्या राज्याची विजेची मागणी 28 हजार मेगावॅटच्या घरात असून त्यामध्ये झपाटय़ाने वाढ होत आहे. वर्षाला 200-250 मेगावॅटची भर पडत आहे. त्यामुळे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीने पंबर कसली असून भुसावळ औष्णिक वीज पेंद्रात 660 मेगावॅट क्षमतेचा चौथा वीज संच उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होऊन येथून वीज निर्मिती करता येणार आहे. त्यामुळे भुसावळ वीज पेंद्राची एकूण वीज निर्मिती क्षमता 1870 मेगावॅट एवढी आहे. त्यामुळे महावितरणला पुरेशी वीज उपलब्ध होणार असून खुल्या बाजारातील महागडी वीज खरेदी टाळता येणार आहे. त्याचा थेट फायदा सर्वसामान्य वीज ग्राहकांना होणार आहे. दरम्यान, वीज संचाचे काम वेळेत पूर्ण करावे म्हणून महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी नुकतीच दिल्लीत भेल पंपनीचे सीएमडी डॉ. नलिन शिंघल यांची भेट घेत वेळेत काम पूर्ण करण्याबाबत चर्चा केली.