‘बिग बॉस’ म्हटलं की ड्रामा, मनोरंजन, भावना आणि ट्विस्ट या सर्व गोष्टी आल्याच. ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात पहिल्यांदाच घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांची एन्ट्री झाली. या चिमुकल्या पाहुण्यांनी सदस्यांना निरागस सुखासह टास्कचं दु:खंदेखील दिलंय. यावेळी घरातील काही सदस्य बाळाची सर्वोत्तम काळजी घेताना दिसून आले. पण आजच्या भागात भावनांच्या या खेळात सदस्य भावशून्य झालेले दिसून येणार आहेत. त्यामुळे आता ‘बिग बॉस’ काय रिअॅक्शन घेणार हे पाहावे लागेल.
View this post on Instagram
बिग बॉसच्या घरात चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन होताच ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य त्यांच्यासोबत जोडले गेले. सदस्य या पाहुण्यांसोबत वेळ घालवताना दिसून आले. तर काहींनी या पाहुण्यांवरुन भांडणेदेखील केली. पण पाहुण्यांनी मात्र घरातल्या सदस्यांसोबत चांगला वेळ घालवला.
‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”हा खेळ मानवी भावनांचा आहे. मात्र दोन्ही टीम भावनाशून्य होऊन खेळलात. त्यामुळे मी देखील आता भावनाशून्य होऊन…”. घरातील सदस्य भावनाशून्य खेळल्याने बिग बॉस सदस्यांना काय शिक्षा देणार हे पाहावे लागेल.