19 वर्षांनंतर ऑटो क्षेत्रात मंदीची लाट,प्रवासी वाहनांच्या विक्रीत 31 टक्क्यांनी घट

305

ऑटो क्षेत्रात तब्बल 19 वर्षांनंतर मंदीची लाट आली असून प्रवासी वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. यंदा जुलैमध्ये वाहनांची विक्री 30.98 टक्क्यांनी खाली आली असून 2 लाख 790 युनिट वाहनांचीच विक्री झाली. गेल्या वर्षी जुलैमध्ये हे प्रमाण 2 लाख 90 हजार 931 एवढे होते. दुचाकींची विक्रीही 16.82 टक्क्यांनी कमी झाली आहे.

इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्सने मंगळवारी वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली. वाहन विक्रीत 35.95 टक्क्यांची घट होऊन एकूण 1 लाख 22 हजार 956 युनिट विक्री झाली. मोटरसायकलची विक्री जुलै महिन्यात 18.88 टक्क्यांनी कमी झाली. जुलै 2018 ला 11 लाख 51 हजार 324 मोटारसायकल विकल्या गेल्या. यंदा 9 लाख 33 हजार 996 युनिट मोटारसायकलची विक्री झाली.

  • दुचाकींचा विचार केल्यास गेल्या वर्षी 18 लाख 17 हजार 406 युनिट विक्रीमध्ये घट होऊन यंदा 15 लाख 11 हजार 692 युनिट विक्री झाली आहे.
  • कमर्शियल वाहनांची विक्री 25.71 टक्क्यांनी कमी झाली. 56 हजार 866 युनिट वाहने विक्री झाली.
  • सर्व प्रकारच्या वाहनांच्या एकूण विक्रीत 18.71 टक्क्यांची घट होऊन 18 लाख 25 हजार 148 युनिट वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी जुलैमध्ये 22 लाख 45 हजार 223 वाहनांची विक्री झाली.
  • यापूर्वी डिसेंबर 2010 मध्ये वाहनांच्या विक्रीत 21.81 टक्क्यांची घट झाली होती.
  • ऑटो सेक्टरमधील मंदीमुळे गेल्या दोन-तीन महिन्यांत 15 हजार जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पण ही मंदी संपली नाही तर आणखी काही जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील.
आपली प्रतिक्रिया द्या