पार्किंगवरून झाला वाद, ज्यूस विक्रेत्याने गाडी चालकाचे मुंडके छाटून रस्त्यात फेकले, पुढे घडले आणखी भयंकर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमधील अररिया जिल्ह्यात फारबिसजंग येथे पार्किंगवरून झालेल्या वादावरून एका ज्यूस विक्रेत्याने एका कार चालकाची गळा चिरून मुंडके छाटले. त्याने भररस्त्यात कार चालकाचे मुंडके फेकले. त्यानंतर संतप्त जमावाने ज्यूस विक्रेत्याला पोलिसांच्या ताब्यातून हिसकावून घेत त्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली.

फारबिसगंज येथील कृषि उत्पादन बाजार समितिच्या गेटवर राहुल चौहान याचा ज्यूसचा स्टॉल होता. त्या ठिकाणी मोहम्मद मुद्दीन यांनी गाडी पार्क केली होती. त्यावरून राहुल व मुद्दीन यांच्यात वाद झाला. त्या रागात राहुलने स्वत:कडील चाकूने मुद्दीन याचा गळा चिरला व त्यांचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर तो पोलिसांपासून वाचण्यासाठी झुडुपात लपला होता.

दरम्यान पोलीस घटनास्थळी आल्यावर लोकांनी त्यांना राहुल लपलेल्या ठिकाणी नेले. पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतात तिथे असलेल्या जमावाने त्याला पोलिसांकडून हिसकावून घेतले व त्याला मारहाण करायला सुरुवात केली. जमावाने केलेल्या मारहाणीत राहुल जागीच ठार झाला.