
छत्तीसगढच्या बीजापुर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना यश आले आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांना ठार केले. सुरक्षा दलाची गेल्या 24 तासांतील ही दुसरी कारवाई आहे. गुरुवारी गरियाबंद जिल्ह्यात तब्बल 10 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.
बीजापूर जिल्ह्याच्या नैऋत्य भागात नक्षवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षादलाकडून शोध मोहिम सुरू कऱण्यात आली. या मोहिमेदरम्यान, शुक्रवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या शोध मोहिदरम्यान आत्तापर्यंत 2 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तसेच, घटनास्थळावरून 303 रायफल आणि इतर शस्त्रे, स्फोटके आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.



























































