दिशादर्शक फलक अंगावर पडून दुचाकी स्वाराचा मृत्यू

अहमदपुर – लातुर – नांदेड राष्ट्रीय महामार्ग 361 शिरूर ताजबंद अहमदपूर रोडवर महादेववाडी पाटी जवळ शनिवारी संध्याकाळी 4.45 वाजता दुचाकी स्वार अहमदपुर वरून शिरूर ताजबंद दिशेने जात होता. यावेळी जोराच्या वाऱ्याने दिशादर्शक फलक अंगावर पडून महादेव वाडी पाटी जवळ दुचाकी स्वार जागीच ठार झाला असून मोटार सायकल क्रमांक MH 20 – 7701 असा असून फलक अंगावर पडल्याने मोटार सायकल स्वार फलक खालीच आहे त्यामुळे अद्याप मयताची ओळख पटलेली नाही.