
सरकारने रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी सेवांना फक्त इलेक्ट्रिक वाहन असणे अनिवार्य केले आहे. मात्र अनेक बाईक टॅक्सींकडून बेकायदेशीरपणे ही सेवा दिली जात आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनसक्ती ठीक, मात्र सुरक्षेचे काय, असा सवाल बाईक टॅक्सी संघटनांकडून करण्यात येत आहे.
शहरी वाहतुकीतील सुरक्षितता ही वाहन पेट्रोलवर चालते की विजेवर चालते यापेक्षा त्या सेवेच्या रचनेची पद्धत, देखरेख आणि जबाबदारीवर अधिक अवलंबून असते, असे रॅपिडोच्या ग्राहक सेवा वितरण विभागाचे उपाध्यक्ष रिझवान शेख यांनी म्हटले आहे. बाईक टॅक्सीची सेवा देणाऱया पंपन्यांनी सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. प्रवाशांच्या सुरक्षेची हमी घेणाऱया संस्थांबाबत सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत.






























































