
धुमस्टाईलने बाईक पळवणारे दोन बाईकस्वार बाईकसह नायगाव उड्डाणपुलावरून खाडीत कोसळल्याची घटना आज पहाटे घडली. या अपघातात एका बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव रोहित सिंग (२०) असे आहे.
नायगाव पूर्व व पश्चिमेला जोडणारा नायगाव उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. आज पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून रोहित आणि त्याचा सहकारी नायगाववरून उमेळाफाटा येथे भरधाव वेगाने जात होते. त्यांची बाईक नायगाव पुलावर आल्यानंतर चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि बाईक कठड्याला धडकून पुलावरून खाली कोसळली. यात रोहित सिंग आणि त्याचा मित्र विघ्नेश कटकिरवा हे दोघे गंभीर जखमी झाले. स्थाानिक रहिवाशांनी त्यांना तातडीने वसईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रोहित या तरुणाचा मृत्यू झाला. रोहित हा मुंबईच्या गोरेगाव येथे राहणारा होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विघ्नेश कटकिरवावर बंगली येथील कार्डिनल रुग्णाल यात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करीत आहेत.
अपघातात दोघांचा बळी शहापूर : समृद्धी महामार्ग
आणि मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू तर चारजण जखमी झाल्याची घटना आज घडल्या. नाशिक – मुंबई महामार्गावर मुंबई वाहिनीवर एका ट्रॅक्टरला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टरमधील दिनेश पवार (२१) याचा मृत्यू झाला असून सागर पवार, सुनील वाघ व कृष्णा दिवा हे तिघेजण जखमी झाले आहेत. आटगाव हद्दीतील बॉम्बे ढाब्याजवळ हा अपघात घडला. दुसरी घडना नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर घडली. नवी मुंबई येथे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने पिकअप वाहनातील क्लि नर किरण कोळी (२८) याचा मृत्यू झाला.



























































