भाजपचे माजी आमदार आर.टी देशमुख यांचे अपघाती निधन, मुसळधार पावसामुळे गाडी उलटली

माजलगावचे माजी आमदार आर.टी देशमुख यांच्या फॉर्च्युनर गाडीचा औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात देशमुख यांचे निधन झाले आहे. तर त्यांच्या गाडीचा चालक व दोन अंगरक्षक गंभीर जखमी झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूलावरून जात असताना देशमुख यांची फॉर्च्युनर गाडी स्लिप झाली व गाडीने चार ते पाच वेळा पलटी मारली. महामार्गावर पाणी साचल्याने गाडी घसरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या भीषण अपघातात देशमुख गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आर.टी देशमुख यांनी 2014 साली भाजपच्या तिकीटावर माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांचा पराभव केला होता.