
राजस्थानच्या अजमेर जिह्यातील किशनगड येथील भाजप नेता रोहित सैनीने त्याची प्रेयसी रितू सैनीच्या सांगण्यावरून पत्नी संजू सैनी हिची हत्या केली. त्याला अटक झाली आहे. 10 ऑगस्ट रोजी हा गुन्हा घडला होता. मात्र हत्या केल्यानंतर दरोडय़ाचा बनाव केल्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्यात आली होती. पोलिसांनी कसून तपास करत आता रोहित सैनी आणि प्रेयसी रितूला अटक केली. सुरुवातीला पती रोहित सैनीने दावा केला की, अज्ञात दरोडेखोरांनी त्याच्या पत्नीची हत्या केली आणि घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पळाले.