
भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री राज पुरोहित यांचे आज मुंबई रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. पुरोहित यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले गेले. या वेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
राज पुरोहित यांना 15 जानेवारी रोजी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज पुरोहित भाजपचे ज्येष्ठ व अभ्यासू नेते होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते. राज पुरोहित यांनी मुंबादेवी आणि कुलाबा मतदारसंघातून 1990, 1995, 1999 आणि 2004 अशा चार टर्म विधानसभेवर प्रतिनिधित्व केले होते.






























































