आमच्या विचारसरणीच्या लोकांची नावं मतदार यादीतून काढली जात आहेत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याने आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार अशी माहिती पटोले यांनी दिली.
पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मतदारांच्या अडचणी समोर आल्या आहेत. आम्हाला पाठिंबा देणारे, आमच्या विचारसरणीच्या मतदारांचे मतदान यादीतून नाव काढली जात आहेत. भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.चोकलिंगम यांची उद्या सकाळी 11 वाजता भेट घेणार आहोत अशी माहिती नाना पटेल यांनी दिली आहे.
#WATCH | Mumbai: Maharashtra Congress chief Nana Patole says, “…Tomorrow we have an important meeting, tomorrow at 11 am we will meet Chief Electoral Officer S Chockalingam. We have spotted certain problems in Maharashtra…those people who are our supporters, their names are… pic.twitter.com/8ih6KjieTW
— ANI (@ANI) October 17, 2024