
सामना ऑनलाईन, गंगापूर
मी फोन केल्यावर तू गाडी का सोडली नाही, तसेच सॅल्युट केला नाही म्हणून भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांना दमबाजी केली. तहसील कार्यालयात चालू असलेल्या क्रीडा संकुलासंदर्भाच्या संदर्भात एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला आमदारांसह पोलीस अधिकारीही उपस्थित होते. यातील उपनिरीक्षक इंगळे यांना भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी मला सॅल्यूट का घातला नाही व मी फोन केल्यावर पकडलेली गाडी का सोडली नाही ? असे म्हणत इंगळे यांना दमबाजी केली. तुमच्या एरियात किती अवैध धंदे चालू आहेत ते आधी बघा. तुमच्या एरियात एक जरी अवैध धंदा आढळून आल्यास तुम्ही राजीनामा द्याल का? असा सवाल केला. यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक इंगळे यांना विचारले असता झाला प्रकार सगळ्यांचा समोर झाला. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे व नियमानुसार आम्ही करतो. लोकप्रतिनिधींनी सांगितले तरी नियमानुसारच काम करावे लागते, असे ते म्हणाले.


























































