राज्याच्या राजकारणाबाबत राजधानी दिल्लीत मोठी घडामोड; भाजप प्रदेशाध्यक्षांनी घेतली अमिश शहांची भेट

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणकीवरून वातावरण तापले आहे. तसेय या काळात महायुतीतील अंतर्गत कलह उघड झाला होता. तसेच भाजप, मिंधे गट आणि अजित पवार गट यांच्यात सर्व आलबेल नसल्याचेही स्पष्ट झाले होते. तसेच भाजप आणि शिंदे गटाकडून सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाची चर्चा आणि एकमेकांविरोधातील तक्रार थेट दिल्लीपर्यंत पोहचली होती. आता या सर्व राजकारणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड घडली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमित शहा यांची भेट घेत त्यांना याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शाहांची नवी दिल्लीत भेट घेतली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरू आहेत. दिल्लीत मध्यरात्री उशिरा गृहमंत्री अमित शाहांबरोबर संघटनात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. आगामी निवडणुका तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर चव्हाण शहांच्या भेटीला नवी दिल्लीत गेल्याने राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्यातील आगामी निवडणुकीसंदर्भात झालेल्या चर्चेचा सारांश शाहांकडे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांची दिली आहे.