चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो अन् भाजप प्रकरण दाबून ठेवतो! अनिल देशमुख यांच्याकडून हल्लाबोल

>> सूरज बागडे, भंडारा

बदलापूर येथे चिमुकल्या विद्यार्थिनींवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. तसेच त्यांनी लाडक्या खूर्चीसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जात असल्याचा आरोप केला आहे.

बदलापूर येथे जी घटना घडली आहे ती अतिशय दुर्दैवी घटना आहे.साडे तीन चार वर्षाच्या मुली त्यांच्यावर अत्याचार झाला आणि हा अत्याचार झाल्या नंतर आदर्श शाळेमध्ये घटना घडली ती शाळा एका भारतीय जनता पक्षाशी निगडित व्यक्तीची असल्यामुळे हे प्रकरण कसे दाबता येईल याचा प्रयत्न झाला. चार दिवस हा प्रकरण दाबण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केला पण चार दिवसानंतर त्या पीडित मुलीच्या आईने जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपली दाद मागण्याचा प्रयत्न केला तिथे गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तिची आई गरोदर असताना सुद्धा 13 तास तिथे गुन्हा दाखल करून घेतला नाही. बाहेर बसवून ठेवलं. यावरून कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे सरकार काम करते ती शाळा कुणाची ही असो अशा पद्धतीची घटना घडत असेल त्या पीडित महिलेला न्याय मिळाला पाहिजे. पण मात्र भारतीय जनता पक्षाचे प्रकरण दाबून ठेवते देवेंद्र फडणवीस हे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी दिल्लीला गेले आणि दिल्ली हून स्टेटमेंट दिलं की नाही पोलिसांनी FIR दाखल करण्यासाठी वेळ लावला नाही. त्यांनी जाहीर केलं हजारो लोक रस्त्यावर आले महाराष्ट्र संपूर्ण पेटला होता अशा वेळेस तरी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र मध्ये येऊन प्रकरण हाताळायला पाहिजे होतं.मात्र असं काही झालं नाही अशा घटना 10 दिवसात 12 घटना घडलेल्या आहेत, अशा बाबीं मध्ये गृहमंत्री यांनी लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

लाडकी बहीण योजना असो वा लाडका भाऊ असो ही योजना फक्त लाडक्या खुर्ची साठी चालू आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.

लाडकी बहीण योजनेतील पैसे हे आदिवासी यांच्या बजेट मधील वळते केले आहेत ही खरी गोष्ट आहे. नगर पालिका, महानगर पालिका यांचे डेव्हलपमेंटचे पैसे उडवले आहेत. लाडकी बहीण योजना असो वा लाडका भाऊ असो ही योजना फक्त लाडक्या खूर्चीसाठी चालू आहेत. लाडकी बहीण योजना ही काही महिन्यांकरिता राबवणार आहे. निवडणूक आहे तो पर्यतही योजना राबवायची आणि निवडणूक झाली की काही राहणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

उद्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची बैठक आहे त्यामध्ये सविस्तर चर्चा होईल अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.