तिकीट नाकारल्यानं झोल केला अन् डुप्लिकेट एबी फॉर्म भरला; भाजप नेत्याची चोरी पकडली गेली

राज्यात 29 महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत संपली असून सध्या अर्जांची छाननी सुरू आहे. या निवडणुकीसाठी राज्यभरात विविध पक्षांनी इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. मात्र महायुतीमध्ये एबी फॉर्मवरून चांगलाच गोंधळ उडाला. अनेक ठिकाणी नाराजांचा उद्रेक झाला. मात्र मुंबईत एका इच्छुक उमेदवाराने चक्क डुप्लिकेट एबी फॉर्म दाखल केला. अखेर त्याची चोरी पकडण्यात आली आणि हा गैरप्रकार उघडकीस आला. याबाबत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले आहे.

मुंबईतील सायन येथे हा प्रकार घडला आहे. प्रतिक्षा नगर येथील प्रभाग क्रमांक 173 मध्ये दत्ता केळुस्कर नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. आधी एबी फॉर्म देऊनही त्यांना तिकीट नाकारण्यात आले. यामुळे त्यांच्या पत्नीने डुप्लिकेट एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज सादर केला. हा प्रकार उघडकीस आल्यावर एकच खळबळ उडाली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिती उमेदवाराने डुप्लिकेट फॉर्म जोडल्याचे नमूद करत अर्ज रद्द करण्याची मागणी केली.

कुलाब्यात उमेदवारांना दमदाटी; विधानसभा अध्यक्षांना हे कृत्य शोभत नाही, संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना फटकारले

नक्की काय घडलं?

प्रभाग क्रमांक 173 मध्ये भाजपने दत्ता कुळेस्कर यांना अधिकृत एबी फॉर्म दिला होता. मात्र नंतर हा प्रभाग शिंदे गटाकडे गेला. यामुळे दत्ता केळुस्कर आणि त्यांची पत्नी शिल्पा केळुस्कर यांनी बंडाचा पवित्रा घेतला. दरम्यानच्या काळात दत्ता केळुस्कर यांच्याकडे पक्षाने दिलेला अधिकृत एबी फॉर्म परत मागवण्यात आला. फॉर्म परत करण्याआधी केळुस्कर यांनी त्यांची कलर झेरॉक्स काढून घेतली. याच कलर झेरॉक्सच्या आधारे शिल्पा केळुस्कर यांनी भाजप आणि अपक्ष अशा दोन स्वरुपात उमेदवारी अर्ज दाखल करत थेट निवडणूक आयोगालाच गंडवले. हा झोल लक्षात येताच पक्षातील एका पदाधिकाऱ्याने साटम यांच्या कानावर हा प्रकार घातला.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात ‘नाराजी’नामा सत्र, आणखी पदाधिकारी राम राम करण्याच्या तयारीत