कराची बेकरीची तोडफोड

भाजपच्या कार्यकर्त्यांनी हैदराबादमधील कराची बेकरीच्या एका शाखेची तोडफोड केल्याचे वृत्त आहे. बेकरीच्या मालकांनी दुकानाचे नाव बदलावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे, असे तेलंगणा पोलिसांनी सांगितले. शनिवारी दुपारी 3 वाजता झालेल्या आंदोलनादरम्यान ही घटना घडली, बेकरीतील कोणत्याही कर्मचाऱयाला दुखापत झाली नाही. घटनेच्या काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि भाजप कार्यकर्त्यांना पिटाळले असे पोलिसांनी सांगितले.