
ठाणे (पडवळ नगर) शेठ बी. एम. पडवळ विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम विभागाने गेले 18 वर्षे दहावीचा 100 टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. यावर्षी शाळेत प्रथम क्रमांक श्रध्दा सूर्यवंशी 96.40 टक्के, द्वितीय क्रमांक पैर्णिमा अनिल चासकर 96.20 टक्के व तृतीय क्रमांक तेजस्वी पडाळकर 94.20 टक्केसह उत्कृष्ट गुण संपादन करून विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. पडवळ नगर एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यांनी, विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकवर्ग, पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.