पाणी तुंबू नये यासाठी ‘एमएमआरडीए’शी समन्वय ठेवा, आयुक्तांचे पालिका अधिकाऱ्यांना सक्त निर्देश

7


सामना ऑनलाईन । मुंबई

संपूर्ण मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असून रस्त्यावर चर आणि खड्डे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना ‘एमएमआरडीए’शी नियमित समन्वय साधून उपाययोजना कराव्यात असे सक्त निर्देश दिले आहेत.

‘एमएमआरडीए’ व ‘मुंबई मेट्रो’च्या मुंबईत सुरू असलेल्या विविध कामांमध्ये निर्माण होणारा गाळ, राडारोडा पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये वाहून आल्यास या जलवाहिन्या बंद होऊन पाणी तुंबण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विविध कामांमध्ये गाळ, राडारोडा पालिकेच्या पर्जन्यजल वाहिन्यांमध्ये काहून येणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी वेळोवेळी बैठका घेऊन, समन्वय साधून उपाययोजना कराव्यात, असे आदेश आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गाळ, राडारोड्याच्या विल्हेवाटीवर नजर ठेवा
‘एमएमआरडीए’, मुंबई मेट्रो इत्यादींच्या कामांमध्ये निर्माण होणारा गाळ, राडारोड्याची किल्हेकाट योग्य प्रकारे लाकली जात असल्याची खातरजमा संबंधित किभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी नियमितपणे व वेळोकेळी करवून घ्यावी असे निर्देशच आयुक्तांनी दिले आहेत. ‘एमएमआरडीए’, मुंबई मेट्रो व पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची समन्वयासाठी बैठक आयोजित करण्याचे निर्देशही आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) प्रवीण दराडे यांना दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या