
बॉलीवूडचा ‘किंग’ शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची पहिली वेब सीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ लवकरच येत आहे. या वेब सीरिजचा प्रीह्यू नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी शाहरुख खानही उपस्थित होता. काही दिवसांपूर्वी दुखापत झालेल्या हातावर शस्त्रक्रिया झाली आहे. ही सर्जरी थोडी मोठी होती. मला पूर्णपणे बरे व्हायला अजून एक-दोन महिने लागतील, परंतु नॅशनल अॅवॉर्ड घेण्यासाठी माझा एक हात पुरेसा आहे, असे शाहरुख म्हणाला. शाहरुखला काही दिवसांपूर्वी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
खरं म्हणजे मी सध्या एकाच हाताने सर्व कामे करत आहे. जेवण एकाच हाताने करतो. ब्रशसुद्धा एकाच हाताने करतो. पाठीला खाज आली असेल तर तेही एकाच हाताने करतो, असे गमतीने म्हटलेय. किंग चित्रपटाच्या शूटिंगवेळी शाहरुखच्या हाताला दुखापत झाली आहे. शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेला जावे लागले होते. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी शाहरुखला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. किंग चित्रपटाची शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सीरिजमध्ये आर्यन खान दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. या सीरिजमध्ये बॉबी देओल, राघव जुयाल, मोना सिंह, आन्या सिंह, गौतमी कपूर, मनोज पाहवा, विजयंत कोहली आणि मनीष चौधरी यांच्या भूमिका आहेत.