बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर सिनेमांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते, जिथे ती दररोज आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रावर तिचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये ती सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. ती या फोटोंमध्ये समुद्रकिनाऱ्यावर दिसत आहे. अवनीत कौरने या व्हेकेशनसाठी पांढऱ्या रंगाचा कट आउट बीच ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यासोबत अभिनेत्रीने निळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा घातली आहे ज्यामध्ये ती स्टनिंग दिसत आहे. अवनीत कौरने ओपन लॉक्स, न्यूड शेड लिपस्टिक आणि किमान मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. यादरम्यान अवनीत कौर एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसली.