
फॅशन इंडस्ट्रीतील सर्वात मोठा इव्हेंट मेट गाला 2025ला दणक्यात सुरूवात झाली. या सुप्रसिद्ध फॅशन शोसाठी बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सध्या त्यांच्या आऊटफीटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरनेही या इव्हेंटला हजेरी लावली.
जान्हवीने मेट गाला 2025 मधील लेटेस्ट लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यावेळी जान्हवीने बेबी पिंक रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने मोत्याचे दागिने परिधान केले होते. यामध्ये ती कमालिची सुंदर दिसत आहे.
जान्हवीने तरुण ताहिलियानीने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.
जान्हवीचे फोटो पाहून लोकांना तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींची आठवण झाली. सोशल मीडियावर तिच्या लूकचं खूप कौतुक होत आहे. ही जान्हवीची तिच्या आईला श्रद्धांजली आहे, असं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
जान्हवीचा ‘होमबाउंड’ हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे..