बॉलिवूडच्या ‘ये जवानी है दिवानी’ या सुप्रसिद्ध चित्रपटातील सर्वांची लाडकी अदिती म्हणजेच अभिनेत्री कल्की कोचलिन. ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनात तिचं वेगळं स्थान निर्माण केलं. कल्कीनं आजवर काही मोजकेच चित्रपट केले आहेत. कल्कीने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. अभिनयासोबतच आपल्या बोल्ड विचारांसाठीही कल्की नेहमीच चर्चेत असते.
कल्की बोल्डनेससोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाश झोतात आली. तिने अनेकदा याबाबत मोकळेपणाने संवाद साधला आहे. काही दिवसांपूर्वी ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीवेळी कल्कीने पॉलिएमरी रिलेशनशिपबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही खुलासे केले. दरम्यान, कल्कीला पॉलिएमरी रिलेशनशिपबाबत विचारले असता तिने यावर भाष्य केले.
कल्की यापूर्वी पॉलिएमरी रिलेशनशिपमध्ये राहिलेली आहे. ‘मी आता विवाहित आहे आणि मला एक मुलगीही आहे. आता या सगळ्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मी माझ्या भूतकाळात अशा रिलेशनशिपमध्ये होते. ही व्यक्तीची स्वतःची निवड आहे. अशा रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वतःसाठी काही नियम आणि सीमा निर्माण कराव्या लागतात. तो काळ माझ्या आयुष्यातील खूप वेगळा होता. त्यावेळी मी खूप लहान होते, मला माझा संसार थाटण्यात अजिबातच रस नव्हता, म्हणून कदाचित अशी नाती माझ्यासाठी उत्तम होती. पण आता मी पूर्णपणे वेगळी आहे. इतरांप्रमाणे मीही आता पॉलिमरी सारख्या नात्यात राहू शकत नाही, असे कल्कीने पॉलिएमरी रिलेशनशिपबाबत विचारलेल्या प्रश्नावर बेधडक भाष्य केलं.
पॉलिएमरी रिलेशनशिप म्हणजे काय?
Polyamory हा ग्रीक आणि लॅटिन भाषेतील दोन शब्दांपासून बनलेला शब्द आहे. पॉली म्हणजे अनेक किंवा एकापेक्षा जास्त आणि amory म्हणजे प्रेम. म्हणजेच याचा अर्थ एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींवर प्रेम करणे असा होतो.