
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात बॉम्बच्या निनावी फोनने एकच खळबळ उडाली होती. विमानात तपासणी केल्यानंतर ती अफवा असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून विमानात बॉम्बस्पह्ट होण्याचे ई-मेल, फोन, चिठ्ठी ठेवण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. नुकताच सहार पोलिसांना एका खासगी विमानात बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन आला. ते विमान चंदिगढ येथून मुंबईला येणार होते. बॉम्बच्या अफवेच्या फोननंतर विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनस येथे उतरवले. त्यानंतर तपासणी केल्यावर काहीच संशयास्पद आढळून आले नाही. बॉम्बच्या अफवेचा फोन करणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.