
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाङ्गी हिंदुस्थानने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानी दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या दिवशी मुलीचा जन्म झाल्याने मुलीचे नाव ‘सिंदुरी’ ठेवले आहे. बिहारच्या कटिहार जिह्यातील एका जोडप्याने आपल्या मुलीचे नाव सिंदुरी ठेवले आहे. काल बुधवारी हल्ल्याच्या दिवशी या मुलीचा जन्म झाला आहे. त्यामुळे या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव सिंदुरी ठेवण्याचा निर्णय घेतला. जम्मू-कश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये घुसून एअर स्ट्राइक केला. या कारवाईत दहशतवाद्यांना जोरदार तडाखा दिला. हिंदुस्थानी हवाई दलाच्या दणक्यानंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. सर्वांनी हिंदुस्थानी जवानांना कडक सॅल्यूट ठोकत त्यांचे अभिनंदन केले आहे.