
पंजाबच्या लुधियानामध्ये एक खळबळजनक घटना घडली असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दोन मुलांची आई असलेल्या महिलेची हत्या तिच्याच प्रियकराने केल्याचं तपासात उघड झालं आहे. तसेच महिलेनेही प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची माहिती समोर आली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर प्रियकर फरार झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, लुधियानामधील एका हॉटेलमध्ये रेखा नावाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृत महिला पतीपासून विभक्त होती आणि दोन मुलांची आई होती. रेखाने पतीला सोडलं आणि त्यानंतर अमित आणि रेखा एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. शुक्रवारी (12 डिसेंबर 2025) एका हॉटेलमध्ये रुम घेऊन ते रहायला आले होते. हॉटेलमध्ये आले तेव्हा सर्व काही सुरळीत सुरू होतं. मात्र, शारीरिक संबंध झाल्यानंतर लग्नावरून दोघांमध्ये वाद झाला. रेखाने लग्नाचा तगादा लावला, परंतू अमितचे लवकरच दुसऱ्या तरुणीसोबत लग्न होणार होतं. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि याच वादात रेखाने अमितचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्यामुळे संतापलेल्या अमितने रेखाचा गळा दाबून जिव घेतला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. India Tv ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
हॉटेल मॅनेजरने सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर घटनेचा उलगडा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर चौकशी केली असता सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी अमितला ताब्यात घेतलं आहे. सध्या अमितवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.



























































